ना फडणवीस, ना पवार... कार्तिकी एकादशीची पूजा कोण करणार ?

08 Nov 2023 14:18:02
पंढरपूर, 
 
pandharpur-ekadashi मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांनाच ऐन दिवाळीच्या तोंडावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार या दोन्ही प्रमुख नेत्यांना आमंत्रण न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. pandharpur-ekadashi कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे.आरक्षणासाठी मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता, मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. pandharpur-ekadashi विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
 
pandharpur-ekadashi
 
 
महाराष्ट्रातील राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. pandharpur-ekadashi तत्पूर्वी, मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार ? अशी चर्चा निर्माण झाली होती. pandharpur-ekadashi पण, अखेरीस मराठा समाजाच्या भावना पाहता हा मान कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूजेचा मान कोणाला मिळणार? या विषयी मात्र  अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.
 
 
कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांना बोलवावे लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. pandharpur-ekadashi यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान नेमका कोणाला द्यायचा? या पेचात मंदिर समिती सापडली असून एकाला बोलावल्यास दुसऱ्याची नाराजी समितीला परवडणारी नव्हती. या पृष्ठभूमीवर मंदिर समितीचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे. 
Powered By Sangraha 9.0