आपली ‘चिती' ओळखण्याची गरज !

Dr.Ram Tupkari-RSS संघटीतता म्हणजे राष्ट्राचा आत्मा

    दिनांक :09-Nov-2023
Total Views |
रेवती जोशी-अंधारे
नागपूर, 
 
Dr.Ram Tupkari-RSS : राष्ट्राविषयीचे विचार मांडताना, पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी ‘राष्ट्राची चिती' ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. राष्ट्राचा आत्मा म्हणजेच राष्ट्र म्हणून ओळख, ताकद, विकास आणि विश्वास निर्माण करणारे सूत्र असल्याचे चिंतन मांडले होते. Dr.Ram Tupkari-RSS हे सूत्र म्हणजेच संघटनाला सांधून ठेवणारी संघटीतता आहे आणि ही एक मानसिक अवस्था असल्याचे मत व्हिएनआयटीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी विभागप्रमुख, दै. तरुण भारतचे माजी प्रबंध संचालक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम तुपकरी यांनी मांडले. संघटन आणि संघटीतता या विषयावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ट्रीटिस अर्थात विस्तृत निबंधाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून डी.एस.सी.(डी.लिट.) हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. Dr.Ram Tupkari-RSS हे औचित्य साधून, तरुण भारत प्रतिनिधीने डॉ.तुपकरी यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
Dr.Ram Tupkari-RSS 
 
Dr.Ram Tupkari-RSS आजघडीला आपली ‘चिती' समजून घेण्याची गरज आहे. संघटनेचा आत्मा म्हणजे चिती, या दीनदयालजींच्या विचारांतून प्रेरणा घेत, चिंतन - मनन करीत, शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑर्गनायझेशनल सायन्स म्हणजेच संघटीततेचे विज्ञान ही संकल्पना मांडणाऱ्या डॉ.तुपकरी यांच्या अभ्यासकार्याला ओळख मिळण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल. मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन आणि सोशियोलॉजी अर्थात समाजशास्त्र या दोन प्रमुख विषयांसह मानसशास्त्राचीही जोड असलेला हा विषय आहे. व्यवस्थापनाचे शास्त्र प्रत्यक्ष अंमलात येऊन, मानवी भावनांची त्याला जोड मिळते आणि मगच संघटीततेच्या भावनेचा विकास होतो. विशेष म्हणजे संघटीतता हा शब्ददेखील डॉ.तुपकरी यांनीच विकसित केला आहे. 
 
 
माणूस एकांगी होतो आहे, स्वत:पुरता मर्यादीत आहे वगैरे बोलले जात असले तरी मनुष्य आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुठल्यातरी संघटनेशी संबंधित आहे. Dr.Ram Tupkari-RSS संघटनेचा उद्देशच मुळात समाजाच्या हितासाठी काही करण्याचा असतो. पण, संघटनात्मक राहण्याची अवस्था म्हणजे संघटीतता, ही सहज संकल्पना समजून घेण्याची गरज डॉ.तुपकरी यांनी व्यक्त केली. एक राष्ट्र म्हणून आधुनिक समाज हा संघटनांचा समाज आहे. स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मानवी गरजा पूर्ण करणारे, काहीसे गुंतागुंतीचे असे हे जाळे आहे आणि प्रत्येकाला त्यात गुंतायचे आहे. हे गुंतणे आणि त्यामागची भावना म्हणजेच संघटीतता आहे, असे विचार डॉ. राम तुपकरी यांनी मांडले.
 
 
Dr.Ram Tupkari-RSS हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यायला हवा, असे सांगताना ते म्हणाले की, संघटना म्हणजे केवळ सामाजिक जीवनातील व्यवस्था नाही तर वसुधैव कुटुंबकम या विश्वव्यापक संकल्पनेतही संघटीतता आहेच. संघटीतता म्हणजे सर्वांना जोडून ठेवणारे एक सूत्र, समान विचार-संकल्पना मग तो राष्ट्रभक्ती असो, धर्म असो किंवा माणुसकीच्या नात्याने जोडलेले संघटन ! ‘चिती' या मानसशास्त्रीय संकल्पनेलाच ‘संघटीत असण्याची अवस्था' म्हणजेच संघटीतता म्हटल्याचे त्यांनी नमूद केले. Dr.Ram Tupkari-RSS राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी दीक्षांत समारंभात डॉ.तुपकरी यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. या पदवीच्या रूपात डॉ. राम तुपकरी यांनी मांडलेला जीवन विचार नव्याने समाजापुढे येईल आणि विद्यार्थी त्यावर संशोधनात्मक काम करतील, असा विश्वास वाटतो.

 
सामाजिक बदलांची चौथी लाट !
आदिम अवस्थेतून सुसंस्कृत अवस्थेत पोहचलेला मानवी मेंदू विविध पातळ्यांवर कार्य करतो. अजूनही समाजात बदल सुरूच असून, सध्याचे युग हे साामजिक बदलांचे आणि मानसिक अवस्थांचे युग आहे. सुधारणांची पहिली लाट कृषीक्षेत्राची, दुसरी उद्योगांची, तिसरी संगणक युगाची आणि सध्याची चौथी लाट ही मानसिक बदलांची आहे. एखाद्या संघटनेशी जोडलेली व्यक्ती, काही मानसिक बंधनांनी जोडलेली असते. उदाहरणार्थ, एखादा कामगार जास्त पगार मिळाल्यानंतरही आपली नोकरी पर्यायाने आपली संघटना सोडत नाही. तर, दुसरा एखादा लगेच सोडून जातो. हा फरक संघटीतता दाखवून देतो, असे डॉ.तुपकरी Dr.Ram Tupkari-RSS यांनी स्पष्ट केले. हा बदल स्वीकारताना आपल्याला नव्याने विचार करावा लागेल आणि या स्वीकारार्हतेतूनच देशापुढच्या समस्या सोडविता येतील. आपलेपणाचा हा भाव विकसित करता येऊ शकतो. नैतिकता, भावनांचा ओलावा आणि संघटनेचे व्यवहार यांची सांगड घालण्याची गरज डॉ.तुपकरी यांनी व्यक्त केली.