अकोला,
Justice Bhushan Gavai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारी जगात आदर्श अशी राज्यघटना निर्माण केली. न्यायदानाच्या प्रक्रियेत राज्यघटना केंद्रस्थानी असावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई Justice Bhushan Gavai यांनी शनिवार 9 डिसेंबर रोजी येथे केले. अकोला येथे कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीच्या कोनशीला समारंभात ते बोलत होते. अकोला येथील कौटुंबिक न्यायालय इमारतीचा कोनशिला समारंभ न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उच्च न्यायालयाचे मुंबई रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल स. किलोर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पालक न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर अध्यक्षस्थानी होत्या. न्यायमूर्ती संजय मेहरे, न्या. यनशिवराज खोब्रागडे, न्या. अभय वाघवासे, प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अद्वैत द. क्षीरसागर, न्यायाधीश शुभदा ठाकरे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण तायडे, विधिज्ञ मोतीसिंग मोहता आदी उपस्थित होते. देशाची राज्यघटना न्याय, स्वतंत्रता, एकात्मतेवर आधारलेली असून ती डोळ्यासमोर ठेवून, तसेच सर्वांसाठी न्याय हे ब्रीद घेऊन न्यायदानाचे कार्य करणे अभिप्रेत आहे. व्यक्तीतील मतभेद दूर करीत एकोपा निर्माण करीत न्यायदानाचे काम कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून व्हावे असेही या प्रसंगी न्या. गवई Justice Bhushan Gavai म्हणाले.
न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. शुभदा ठाकरे यांनी केले.तर अॅड. देवशिष काकड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Justice Bhushan Gavai यावेळी माजी न्यायमूर्ती वल्लभदास मोहता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अकोला न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.