अल्लीपूर येथील राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

    दिनांक :12-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अल्लीपूर,
Khanjeri Bhajan Competition : स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युुवा मंडळाच्या वतीने चार दिवसीय राज्य स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळला. या स्पर्धेत पुरुष ग्रामीण गटात वाशिम, पुरुष शहरी गटात यवतमाळ, महिला गटात चंद्रपूर तर बाल गटात अकोला प्रथम क्रमांक पटकावला. रात्री उशिरा बक्षीस वितरण करण्यात आले.
 
Khanjeri Bhajan Competition
 
बाहेर गावाहून आलेल्या पण बक्षीस न मिळाल्या Khanjeri Bhajan Competition  भजन मंडळांना 1 हजार रुपये मानधन देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला कैलास बाळबुधे, गोपाल मेंघरे, उमेश कापकर, विवेक लिचडे, संदीप नरड, रामप्यारा कामडी, सुधाकर ढोबळे, परेश सावरकर, अरविंद साखरकर, गौरव लिचडे व आयोजन मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.