नागपूर,
Painters आर्ट बुक द प्लॅटफार्म या संस्थेतर्फे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जर्मनीत स्थायिक मूळच्या नागपुरातील कलाप्रेमी अनुराधा निंबाळकर यांच्या कल्पनेतून कला प्रदर्शनीत जर्मनी व भारतातील चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आला होता, यात प्रामुख्याने अमरावतीच्या 'श्री आर्ट' कला वर्गातील १७ विध्यार्थ्यांच्या ८० चित्रांची निवड झाली होती. अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे यांनी उद्घाटन प्रसंगी निंबाळकर दाम्पत्याचे आभार मानले आपल्या भाषणात त्यांनी श्री आर्ट' कला वर्गाचे संचालक प्रा. सारंग नागठाणे यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे.असेही ते म्हणाले.

प्रदर्शनात अलका सिंघई,अस्मिता सिंगणारे, पुजा डहाके,Painters जोस्ना हंसोरीया, अंकिता किनेकर,मुक्ता वाघ,मेघा धवन,क्षितिजा बारोटकर,रिया धमाके, रिध्दी चौधरी, ज्ञानेश्वरी चोपडे, क्षरा मारोडकर , प्रा.सारंग नागठाणे, सागर शिरसुध्दे , जय ठाकरे, चि.स्वरूप बोरकर, उत्कर्ष वानखडे, इशान काथवटे या कलाकारां सोबत जर्मनीतील सहा चित्रकारांच्या चित्रांचा प्रदर्शनात समावेश होता. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनीला नागपुरातील प्रतिष्ठित मान्यवरांचा व कला प्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला.
सौजन्य:पियुष पात्रीकर,संपर्क मित्र