रहिवाशी दाखला मिळत नसल्याने नागरिकांची पंचाईत

    दिनांक :12-Dec-2023
Total Views |
कारंजा लाड, 
resident certificate येथील पोलिस पाटील पद व नगरसेवक पद रिक्त असल्याने नागरिकांना रहिवाशाचा दाखला व इतर दाखले मिळणे दुरापास्त झाले आहे. दाखले मिळत नसल्याने नागरिकांची पंचाइत झाली असून, अनेक नागरिक दाखल्याअभावी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शयता निर्माण झाली आहे.
 
 
resident certificate
 
कारंजा येथे गोपाल पाटील भोयर हे पोलिस पाटील म्हणून कार्यरत होते. परंतु, गेल्या २२ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले, त्यामुळे पोलिस पाटील पद रिक्त झाले तर गेल्या दोन ते अडीच वर्षापासून नगरपरिषदेची निवडणूक न झाल्याने नगरसेवक पदही रिक्त आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, वारसाच्या नोंदीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रासाठी पोलिस पाटलाचा आणि नगरसेवकाचा रहिवाशी दाखला आवश्यक आहे. resident certificate परंतु कारंजा शहरात हे दोन्ही पदे रिक्त असल्याने दाखल्यांसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे, अशा परिस्थितीत महसूल प्रशासनाने दाखले देण्यासाठी एका सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना वेळेत दाखले मिळण्यास मदत होईल आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. कारंजा शहरात पोलिस पाटील व नगरसेवक पद रिक्त असल्याने रहिवासी दाखल्यासह इतर दाखल्या संदर्भात समस्या निर्माण झाली आहे. यासाठी कारंजा शहरालगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे कारंजा शहराचा प्रभाव लवकरच देण्यात येईल, अशी प्रतिक्रीया उपविभागीय अधिकारी ललितकुमार वर्‍हाडे यांनी दिली.