तभा वृत्तसेवा
वणी,
Daksevak strike : डाक विभागात सेवा देणार्या ग्रामीण भागातील कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार, 12 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. वणीतील टिळक चौकातील मुख्य डाकघरासमोर डाकसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. यात वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील डाकसेवक सहभागी झाले आहेत. संपूर्ण भारतात डाकसेवकांनी आपल्या मागण्यांसाठी 4 ऑक्टोबर 2023 रोजी एक दिवसाचा संप केला होता. परंतु सरकारने मागण्या मान्य न केल्याने 12 डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंदमुळे ग्रामीण भागातील Daksevak strike डाकसेवा प्रभावित झाली आहे.
वणी तालुक्यात 270 डाकसेवक Daksevak strike आहेत. डाकसेवकांकडे डाक वितरण, बचत सेवा, आरडी, बँकिंग सेवा, विमा, आयपीपीबी, किसान विकास योजना इत्यादी सेवा पुरवण्याचे काम असते. डाकसेवकांचे रोज चार तासांचे काम असते. या कामासाठी या कर्मचार्यांना 14 ते 15 हजार मासिक मानधन दिले जाते. डाकसेवकांना आठ तासांचे काम देऊन त्यांना नियमित कर्मचारी करावी ही डाकसेवकांची प्रमुख मागणी आहे.
तसेच 12-24-36 वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नती, 5 लाख ग्रँच्युईटी, 5 लाख ग्रुप विमा, ग्रामीण डाकसेवकांच्या कुटुंबियांना मेडिकल सुविधा, कामामध्ये टार्गेट सिस्टमची सक्ती कमी करावी, कमिशन सिस्टीम बंद करावी, इतर कर्मचार्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए, डीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षणभत्ता इत्यादी त्यांच्या मागण्या आहेत. Daksevak strike डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखतपत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्रीपत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे कामांवर याचा परिणाम होत आहे.