शिरपूर जैन,
Car-bicycle Accident : शिरपूर - मालेगाव राष्ट्रीय महामार्ग ४६१ बी वर शिरपूर पासून मालेगावच्या दिशेने २ किमी अंतरावर १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान एका चार चाकी वाहनाने दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. रिसोड कडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणार्या एम.एच.३० एफ. २४८४ या चार चाकी वाहनाने शिरपूर येथील एम.एच.३७ एम ४६३४ या दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेले दगडू मोतीराम बाभने (वय ५२) यांना जबर मार लागला यामध्ये त्यांना उपचारासाठी अकोला कडे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. Car-bicycle Accident तर दुचाकी चालवणारा विनोद श्रीवास्तव (वय ४०) हा युवक जखमी झाला आहे.
विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते. दरम्यान शिरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर मागून आलेल्या एका चार चाकी वाहनाने पाठीमागून येऊन जबर धडक दिली. Car-bicycle Accident दुचाकीस्वारास जबर धडक दिल्यानंतर चार चाकी वाहनाने तेथून पोबारा केला आहे. सदर घटनेची माहिती ऑटो युनियनचे अध्यक्ष कैलास भालेराव यांनी तातडीने शिरपूर पोलीस स्टेशनला दिली व खाजगी रुग्णवाहीकेने जखमींना रुग्णालयात भरती केले. घटनेची माहिती मिळताच पो.हे. कॉ. अमोल घायाळ , सतीश चव्हाण, प्रवीण सेन्द्रे, विजय बोरकर यांनी घटना घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत. पोबारा केलेल्या वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.