अध्यक्षपदाचा राजीनामा, पण रिमोट माझ्याकडेच

    दिनांक :15-Dec-2023
Total Views |
- मधुकर काठोळे यांची पत्रपरिषदेत घोषणा

यवतमाळ, 
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष Madhukar Kathole मधुकर काठोळे यांनी 3 जानेवारीला अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मात्र, रिमोट आपल्याच हातात राहणार असल्याचे शुक्रवार, 15 डिसेंबरला घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पतसंस्थेचे संचालक नदीम पटेल, तुषार आत्राम, सुभाष धवसे, शरद घारोड व इतर संचालक उपस्थित होते. अध्यक्ष काठोळे पुढे म्हणाले, 28 संघटनांनी एकत्र येऊन आमचे 21 संचालक पतसंस्थेवर निवडून आणले. या संचालकांनी एकमताने मला अध्यक्ष केले आहे.
 
 
Madhukar Kathole
 
आम्ही निवडणूक लढविताना दिलेल्या वचननाम्यात स्पष्ट सांगितले होते की, सेवानिवृत्त कर्मचार्‍याने पतसंस्थेच्या पदावर राहू नये. मी सेवानिवृत्त झालो असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. त्या अनुषंगाने मी पदाचा राजीनामा देणार आहे. येत्या 15 दिवसांत नव्या पदाधिकारी निवडीच्या दृष्टीने संचालक मंडळासोबत चर्चा करून एकमताने निर्णय घेणार आहोत. नवीन अध्यक्षाला वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन मी करणार असल्याचे यावेळी Madhukar Kathole मधुकर काठोळे यांनी सांगितले.