मुंबई :
Prasad Jawade ‘बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे Prasad Jawade गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता.
नुकताच Prasad Jawade प्रसाद अमृता देशमुखसोबत लग्नबंधनात अडकला. आता लग्नाला महिना उलटल्यानंतर दोघेही कामाला लागले आहेत. प्रसाद नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सावली होईन सुखाची' या सन टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत तो झळकणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रसाद जवादे झळकला आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेतली प्रसादची एन्ट्री पाहून काही प्रेक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.