भाताच्या कोठारात बहरणार ज्वारी

गव्हापेक्षा ज्वारीचे क्षेत्र अधिक

    दिनांक :15-Dec-2023
Total Views |
गोंदिया, 
Sorghum Crop : भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. जिल्ह्यात सुमारे 535.89 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गव्हाच्या क्षेत्रापेक्षा ज्वारीचे लागवड क्षेत्र यंदा जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात भात, गहू, हरभरा, पोपट, मोहरी, जवस, लाखोळी हीच पारंपरिक पिके घेतली जातात. या पिकांव्यातिरिक्त इतर पिकांना येथील वातावरण फारसे पोषक नाही, अशी धारणा येथील बहुतांश शेतकर्‍यांची आहे. मात्र गत काळात अनेक शेतकर्‍यांनी ज्वारी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून जिल्ह्यातही अपारंपरिक पिके घेता येऊ शकतात, हे सिद्ध करून दाखविले आहे.
 
Sorghum Crop
 
गोंदिया जिल्ह्यातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. Sorghum Crop खरीप हंगामात भात पिकाचे उत्पदन घेले जाते. भात पिकाची कापणी झाल्यानंतर रब्बी हंगामात धान, गहू, हरभरा, पोपट, वटाणा, मोहरी, जवस, लाखोळी आदी धान्यांची शेती केली जाते. यापेक्षा अधिक पिके घेण्यास शेतकरी अनुत्सुक असतात. कारण त्यासाठी आवश्यक असणारा मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र अलीकडच्या काळात येथील शेतकरी आपल्या जागेत विविध प्रकारचे प्रयोग करू लागले आहेत. कलिंगड, हळद, आले, मका, ज्वारी अशा पिकांची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करण्याचे प्रयोग करण्याची आणि त्यातून अर्थार्जन करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. जिल्ह्यात धान व दुसर्‍या क्रमांकावर गहू हीच पारंपरिक पीक आतापर्यंत चालत आली. शेतकरी अन्य पिकांकडे वळताना फारसा दिसत नव्हता. धान शेती धोक्याची झाली असल्याने शेतकरी त्याला पर्याय म्हणून अन्य पिकांकडे वळला आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात शेतकर्‍यांनी ज्वारीची लागवड केली आहे. 2232.07 हेक्टर गव्हाचे क्षेत्र आहे पैकी यंदा 533.10 हेक्टरमध्येच गव्हाची पेरणी झाली आहे. ज्वारीचे 435.60 हेक्टर क्षेत्र असून, यंदा 535.89 हेक्टरमध्ये ज्वारीची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.
 
 
ज्वारीच्या मागणीत वाढ
ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फॅच आणि अँटी ऑक्सीडंट आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे ज्वारीच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. Sorghum Crop ज्वारी लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते, मधुमेहात ज्वारी फायदेशीर ठरते. त्वचेच्या कर्करोगापासून ज्वारीमुळे बचाव होतो. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली आहे. उल्लेखणीय म्हणजे गव्हापेक्षा ज्वारीला हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल दरही जास्त आहे.
 
 
535.89 हेक्टरवर लागवड
गोंदिया तालुक्यात ज्वारीचे 59.48 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतानाच 130 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. गोरेगाव 49.40 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, 127.90 हेक्टरमध्ये, अर्जुनी मोर 55.20 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, येथे 117 हेक्टरमध्ये तर देवरीत 67.64 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, 98 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. Sorghum Crop आमगाव तालुक्यात 43.04 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून लागवड फक्त 7.10 हेक्टरमध्ये तसेच सालेकसा तालुक्यात 44.60 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून 19.19 हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.