गोंदिया,
Bridge Office : महाराष्ट्रातील लाखो असंघटित कामगारांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी, महा-ई-सेवा केद्राच्या धर्तीवर प्रत्येक तालुकास्थळी कामगार सेतू कार्यालय सुरू करणार असल्याची आणि कामगार योजना माहिती पुस्तिका वितरण करण्याची घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी, कामगार मोर्चा आयोजित, प्रदेश कार्यकारिणी बैठक व विधानसभा, लोकसभा निहाय पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान सोहळा नागपूर येथील भाजपा कार्यालयात पार पडला त्या प्रसंगी खाडे बोलत होते.
खाडे पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी फिरता दवाखाना, कामगार नाका, निवारा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. नोंदणीकृत ईमारत बांधकाम व इतर कामगारांना भांडे सेट, मल्टीपरपज बेड, घरगुती महीला कामगांराना 10 हजार रुपयांची भांडी देण्यात येणार आहे, प्रत्येक जिल्हात कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी पाच सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांशी करार करण्यात येणार असल्याचे खाडे यांनी जाहिर केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील असंघटित कामगारांचे प्रश्न खाडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे, बाळासाहेब टेमकर, शाम पुसदकर, मंगला भंडारी, विजय पवार, महेंद्र पासलकर, प्रदेश सरचिटणीस मिलिंद देशपांडे, भाग्यश्री देशमुख प्रदेश सचिव भास्कर पराते, जयसिंग कछवाह, बल्लू श्रीवास, अनुप वाडेकर, आनंद भालेराव, प्रदिप पाटिल सोनवणे, सुहास कानगुडे, तुळशीराम दुंडे, विभाग अध्यक्ष रणजित मेडशिकर, जोतिबा नन्नावरे, प्रतापसिंह शिंदे, सुधाकर राजे यांचेसह प्रदेश सदस्य अशिष ढोमणे, कुमार सिरामे, राजाराम पाटिल, राहुल जाधव , उमेश अग्निहोत्री, राहुल कुशवाह, नितिन जांभळे, जोतिराम चिवडे, अविनाश देवकर, जयदेव लकडस्वार, प्रमोद डिमोले, गोवर्धन चव्हाण, अरुण मते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुर्व विदर्भ विभाग अध्यक्ष धनंजय वैद्य, आणि प्रदेश सचिव भास्कर पराते यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केले.