Farmer Accident तालुयातील कुठलाही शेतकरी अपघातात बळी अथवा जखमी झाल्यास शेतकरी अथवा कुटुंबातील वारसदारांना राज्य शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविण्यात येते. तालुयातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा शानुग्रह योजनेत पाण्यात बुडून मृत्यू, जंतू नाशके हाताळताना अथवा अन्य कारणांनी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज अंगावर पडून मृत्यू, उंचावरून पडून मृत्यू, सर्प अथवा विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यात, चाव्यामुळे जखमी/ मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल आणि रस्ता व रेल्वे अपघात आणि इतर कोणत्याही अपघाताचा सुद्धा या योजनेत समावेश होतो.Farmer Accident अपघाती मृत्यू झाल्यास शेतकर्यांना दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये योजनेअंतर्गत देण्यात येते. अपघातात एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लक्ष रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते.
लाभासाठी शेतकर्यांनी सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकर्याचे वारस म्हणून तलाठी कडील गाव नमुना क्र. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते पुस्तक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम प्रस्तावानुसार लागणारे इतर आवश्यक कागदपत्रे.