ठाणे,
चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका Dr. Anjali Kirtane डॉ. अंजली कीर्तने यांचे शनिवारी निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या आई कवयित्री पद्मिनी बिनीवाले आणि मुलगा सलील आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. डॉ. कीर्तने यांचा जन्म 4 मे 1953 रोजी पुण्याजवळील वालचंदनगर येथे झाला होता. त्यांना लेखन आणि संशोधनाचा वारसा आई आणि सुप्रसिद्ध कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांच्याकडून मिळाला. शाळेत त्यांनी अभिनयाबरोबरच भरतनाट्यम् नृत्याचे धडे घेतले. संगीतविश्वातही त्या रमल्या, सतारवादनाचे शिक्षण घेतले.
Dr. Anjali Kirtane : नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये त्यांनी अश्वरोहण, बंदूक चालवण्याचेही शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातील कला शाखेत त्या प्रथम आल्या होत्या. त्यांनी कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णन, चरित्रात्मक अशा प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांच्या संशोधन कार्यामुळे त्यांना व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली. डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व, बहुरुपिणी दुर्गा भागवत, दुर्गाबाई रूप शोध, गानयोगी पं द. वि. पलुस्कर, आठवणी प्रवासाच्या, ब्लोसम, फ्लॉवर, (प्रवासवर्णन), माझ्या मनाची रोजनिशी (कादंबरी), पाऊलखुणा लघुपटाच्या (अनुभवकथन), लघुपटाची रोजनिशी, कॅलिडोस्कोप, हिरवी गाणी (कवितासंग्रह), वेडा मुलगा आणि शहाणी माकडे (बालकादंबरी), मनस्विनी प्रवासिनी (संशोधन-लेखसंग्रह) ही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली होती.