तभा वृत्तसेवा
साकोली,
Narendracharya Maharaj : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (महाराष्ट—) यांच्या पादुका दर्शन सोहळा 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता साकोली येथील क्रीडा संकूलाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेला आहे.
शोभायात्रेद्वारे Narendracharya Maharaj श्रीं च्या पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन आणि पुष्पवृष्टी या क्रमाने पादुका दर्शन सोहळा होणार आहे. यावेळी समस्त भाविकभक्तांना महाप्रसाद वाटप होणार आहे. या महन्मंगल सोहळ्यामध्ये सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून गुरुमाऊलींच्या पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भक्त सेवा मंडळाचे सुरेश लाखे, संतोष भुरे, मनोज तर्हेकर, मुन्नालाल मोटघरे, होमराज वनवे, दुर्गा गिरीपुंजे, आशिष बालपांडे, श्रीधर वैद्य, प्रशांत कुंजेकर, के.डी. लांजेवार, गोपाळ माकडे यांनी आहे.