अकोला जिल्ह्यात सात ठिकाणी सीसीआयद्वारे कापूस खरेदी

    दिनांक :17-Dec-2023
Total Views |
अकोला,
CCI cotton : जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवरून कापूस महामंडळाने अर्थात सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने ही योजना केली असून सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी सात केंद्रांची व्यवस्था जिल्ह्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांकडून सीसीआयने 20 हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी येथे नोंदणी सुरू केली असून सीसीआयने कापसाला 7,020 आणि 6,920 असा भाव निश्चित केला आहे.
 
CCI cotton
 
भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) CCI cotton सध्याच्या हंगामात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 34 खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू असून, खरेदीला वेग आला आहे. कापसाची समर्थन मूल्यांतर्गत खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची नोडल एजन्सी आहे. शेतकर्‍यांना सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन सीसीआय केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. सीसीआयने सर्व खरेदी केंद्रांवर कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून एमएसपीमध्ये कापूस खरेदीसाठी व्यवस्था केली आहे.
 
 
शेतकर्‍यांनी सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर CCI cotton नोंदणी करून घ्यावी, तसेच कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या सीसीआय खरेदी केंद्राच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन सीसीआय व्यवस्थापनाने केले आहे. भारतीय कापूस महामंडळ शेतकर्‍यांकडून समर्थन मूल्यांतर्गत कापूस खरेदी करणार आहे. जिल्ह्यातील अकोला, आकोट ए, आकोट बी, बार्शिटाकळी, चिखलगाव, हिवरखेड, मूर्तिजापूर आणि पारस या सात केंद्रांवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे.