सडक अर्जुनी,
Bag free school : येथील जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 16 डिसेंबर रोजी दप्तरमुक्त शाळेसह योगाचे प्रात्यक्षिक करुन स्वकमाईचा अनुभव घेतला. कार्यक्रमाला पतंजली योगाच्या उषा दत्ता प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम व योगासने याबाबत प्रात्याशिकासह मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डी. पी. डोंगरवार यांनी प्राणायाम व योग यांचे महत्त्व सांगीतले. त्यानंतर ‘खरी कमाई’ अंतर्गत स्काऊट गाईड विभागाद्वारे विविध खाद्य पदार्थाचे स्टाल लावण्यात आले.
स्टालचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांच्या हस्ते डी. पी. डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रसंगी अनिल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या Bag free school कार्यक्रमाचे आयोजन भारत स्काऊट गाईडचे शिक्षक आर. ए. बावनकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खरी कमाई अंतर्गत वेगवेगळे खाद्यपदार्थ विकले. कार्यक्रमाचे संचालन पी. सी. येडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आर. जी. पुस्तोडे, सी. एम. भिवगडे, विलास आगाशे, वाय. वाय. मौडेकर, प्राची मेंढे, सुनंदा मारबते, जयश्री नंदेश्वर यांनी परिश्रम घेतले.