वेध
- नितीन शिरसाट
ethenol-sugarcane उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर घातलेली बंदी भारत सरकारने उठवली आहे. आधीचा आदेश मागे घेतल्यामुळे आता १७ लाख मेट्रिक टन उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आधीचा आदेश मागे घेतल्यामुळे साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वयंस्फूर्तीने स्वागत केले आहे. ethenol-sugarcane ऊस, मका, गोड ज्वारी यांच्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. ज्या वनस्पतींमध्ये स्टार्च आहे त्याचे रूपांतर अगोदर साखरेमध्ये करून नंतरच त्यापासून इथेनॉल तयार केला जातो. भारतामध्ये उसाच्या मळी व मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्याची सुरुवात झाली. ethenol-sugarcane आता थेट उसाच्या रसापासूनही इथेनॉल तयार करायला शासनाची परवानगी मिळाल्यामुळे त्याचीही सुरुवात झालेली आहे.

जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण, शहरीकरण झाल्यामुळे तसेच मानवाची जीवनशैली बदलल्यामुळे इंधनाची गरज वाढली. नैसर्गिक साठा मर्यादित आणि मागणी जास्त यामुळे एकतर इंधनाची कमतरता पडल्याने किमती वाढल्या. पेट्रोल-डिझेलने एका लिटरमागे शंभरी पार केली. ethenol-sugarcane म्हणूनच भविष्यात हा मर्यादित साठा संपल्यानंतर काय हा विचार केला तर या नैसर्गिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार पुढे आला. इथेनॉलचा पहिला प्रयोग १८९७ मध्ये झाला. ज्यावेळी ‘इंटर्नल कम्बशन इंजिनङ्कचा वापर सुरू झाला, त्यावेळी इथेनॉलचा इंधनासारखा वापर करण्यासाठी प्रयोग केला. केंद्र सरकारने साखर उद्योगातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे. ethenol-sugarcane साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल देशातील साखर उद्योगाने यामध्ये गुंतवले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरात जिथे रात्रंदिवस कोणत्याही प्रहरी वाहतूक कोंडी असते अशा ठिकाणी अडकल्यानंतर पेट्रोल-डिझेलचा हिशेब प्रती किलोमीटर खर्च सरासरी १० ते १२ रुपये इतका जातो. ethenol-sugarcane ब्राझीलमध्ये १९२० पासून इथेनॉलचा वापर केला जातो. इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात मिसळून करता येतो तसेच काही गाड्या इथेनॉलवरही चालतात. इथेनॉलच्या वापरामुळे गाडीची कार्यक्षमता वाढते. पर्यावरणातील अनेक घातक वायूंचे प्रमाण कमी होते तसेच वनस्पतीपासून तयार करता येत असल्यामुळे त्याच्या किमती नियंत्रित ठेवणे शक्य आहे. ethenol-sugarcane सध्या जागतिक पातळीवर विशेषतः भारतामध्ये इथेनॉल निर्मिती आणि त्याचा इंधन म्हणून वापर यावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. १९४८ मध्ये फोर्ड कंपनीने अल्कोहोलवर चालणाऱ्या कारमध्ये पहिल्यांदा इथेनॉलचा वापर केला होता.
ब्राझीलमध्ये उसाचे मोठे क्षेत्र असून गरजेनुसार ते साखर तयार करतात आणि राहिलेल्या सर्व उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. ब्राझीलमध्ये सध्या २ कोटी ७० लाख कारपैकी ७३ टक्के कार या इथेनॉल किंवा गॅसोलिनवर चालतात. ethenol-sugarcane १९७५ मध्ये ब्राझीलमध्ये ‘नॅशनल अल्कोहोल प्रोग्रॅम' राबविला आणि फक्त सहाच वर्षांत ९० टक्के कार या इथेनॉल किंवा गॅसोलिनवर चालणाèया विकल्या गेल्या. एवढ्या पद्धतशीरपणे ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातून त्यांची आर्थिक उन्नती झाली. भारताला यापूर्वी या प्रयोगातून चार हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी तेल आणि तेलाच्या राजकारणासाठी पश्चिम आशियातील इस्लामिक राष्ट्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केला. ethenol-sugarcane पाकिस्तानला जवळ करून अमेरिकेने इराण-इराकसारख्या तेल निर्मितीत पुढारलेल्या राष्ट्रांशी जवळीक साधली; परंतु दहशतवादी संघटनांना छुपी आर्थिक मदत करणाऱ्यांनी अमेरिकेचा घात केला.
या विरोधातून विविध दहशतवादी संघटना पुढे आल्या. यामध्ये ‘अल कायदा'सारख्या प्रखर अतिरेकी संघटनेचा उल्लेख करावा लागेल. वाहने ही आता लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी इंधनाच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या पृष्ठभूमीवर आता पर्यावरणप्रेमी लोकांनी मोठ्या प्रमाणावर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. ethenol-sugarcane या वाहनांद्वारे येणारा प्रवास खर्च हा प्रती एक किलोमीटर सरासरी एक रुपया इतका कमी असल्याने लोकांची इंधनावरील खर्चात तर बचत होत आहेच; वाहनांमधून प्रदूषण होत नसल्यामुळे धूरमुक्त, प्रदूषणयुक्त प्रवासाचा आनंददेखील लोकांना मिळत आहे.
९८८१७१७८२८