मेडिकलला 25 लाखांची देणगी

-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचा स्तुत्य उपक्रम

    दिनांक :19-Dec-2023
Total Views |
नागपूर, 
Datta Meghe : दत्ता मेघे इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या नॅक ए प्लस प्लस अभिमत विद्यापीठाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (मेडिकल) अवयव चळवळ अधिक सशक्तपणे राबविण्यांसाठी 25 लाख रुपये देणगी दिली आहे.
 
Datta Meghe
 
संस्थापक कुलपती दत्ता मेघे Datta Meghe यांनी 25 लाख रुपयांचा धनादेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रदान केला. आ. समीर मेघे, संस्थेचे सल्लागार सागर मेघे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, विशेष कार्याधिकारी डॉ. उदय मेघे, संचालक डॉ. अनूप मरार, अधिष्ठाता डॉ. उज्ज्वल गजबे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मोहन फाऊंडेशनच्या समन्वयक वीणा वाठोडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
 
 
 
खाजगी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपणाचा खर्च परवडत नसलेल्या गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश यामागे आहे. मोहन फाऊंडेशन, Datta Meghe महाराष्ट्र शासन व मेडिकल यांच्या संयुक्त पुढाकाराने याबाबत सामंजस्य करार झाला. राज्यातील पाच मेडिकल रुग्णालयात अवयवदानाबाबत समुपदेशन केले जाणार आहे. मात्र, आर्थिक अडचणीमुळे ही बाब रखडली होती. दत्ता मेघे इन्स्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च आर्थिक आधार देणार आहे. मोहन फाऊंडेशन मेडिकलमध्ये समुपदेशक उपलब्ध करून देईल.