विधानसभेत सुषमा अंधारेविरोधात हक्कभंग

देवयानी फरांदे यांचा हल्लाबोल

    दिनांक :19-Dec-2023
Total Views |
नागपूर, 
Devyani Farande : भाजपाच्या नाशिक येथील महिला आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. एका निनावी पत्राचा हवाला देत सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत फरांदेंवर आरोप केले होते. त्यावरून आमदार देवयानी फरांदे Devyani Farande यांनी अंधारेंवर सभागृहात हल्लाबोल केला
 
Devyani Farande
 
आमदार देवयानी फरांदे Devyani Farande म्हणाल्या की, उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या गल्लीबोळात लढणार्‍या नेत्या असतील. परंतु त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या निनावी पत्रावरून पुण्यात माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. मी गेली 30 वर्ष राजकारणात विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतेय. मी आजपर्यंत कुणावरही पुरावा नसताना आरोप केला नाही. या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावे. सुषमा अंधारे यांनी 18 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र देऊन आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केली.पोलिस आयुक्तांनाही पत्र दिले. गेली 4 अधिवेशन मी सातत्याने ड्रग्सविरोधात लढा देतेय. नाशिकला ड्रग्समुक्त करण्यासाठी लढतेय असे Devyani Farande त्यांनी सांगितले.
 
 
तसेच माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले. मी या विषयावर सातत्याने बोलतेय. मात्र ललित पाटील हे उबाठा सेनेचे असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत मी पुराव्यासह विधानसभेत हक्कभंग सुषमा अंधारेंवर दाखल करावा अशी मागणी केली. मात्र, त्यावर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी हरकत घेत सभागृहात हक्कभंग ठराव मांडता येणार नाही. तुमचा प्रस्ताव माझ्याकडे सादर करा, ती तपासून त्यावर उचित निर्णय घेईल, असे Devyani Farande त्यांनी सांगितले.