बाभुळगाव,
निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच बाभुळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावांच्या मतदान केंद्रांची पाहणी Amravati Divisional Commissioner अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. डॉ. निधी पांडे यांचे शुक‘वारी दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर गावी आगमन झाले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
मालापूरच्या मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर यांनी करळगावच्या मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांचे तहसीलदार मीरा पागोरे व गटविकास अधिकारी रविकांत पवार आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वागत केले. मतदान केंद्र पाहणी दरम्यान Amravati Divisional Commissioner डॉ. निधी पांडे यांच्यासह उपायुक्त गजेंद्र बावणे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, निवडणूक नायब तहसीलदार कांबळे, बीएलओ, संबंधित तलाठी व कोतवाल हजर होते.