- 30 हजारांची लाच घेताना केली अटक
मोताळा,
येथील तलाठी किशोर कन्हाळे यांना शेतीच्या हिस्सेवाटीच्या प्रकरणात तीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई अमरावती येथील Bribery Section लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 डिसेंबर रोजी तलाठी कार्यालयात करण्यात आली. तालुक्यातील रोहिनखेड येथील एका व्यक्तीच्या शेतीच्या हिस्सेवाटीचे प्रकरण तलाठी किशोर कन्हाळे यांच्याकडे दाखल होते.
प्रकरण मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी येथील तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. प्रकरण मंजूर करण्यासाठी तलाठी किशोर कन्हाळे यांनी 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. प्रकरणी तक्रारदाराने Bribery Section लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यात अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करीत सापळा रचून 1 डिसेंबर रोजी दुपारी तलाठी कन्हाळे यांना तीस हजार रुपयांची लाच रंगेहाथ पकडले. ही कारवाई अमरावती येथील लाच लुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, युवराज राठोड, विनोदकुमार धुळे, स्वप्निल क्षीरसागर, राहल वंजारींनी केली.