मानोरा,
Farmers तालुयातील शेतकरी निसर्गाच्या असंतूलनाचे शिकार मागील काही वर्षांपासून होत असून नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त शेतकर्यांना मंजूर नुकसान भरपाई शासनाकडून नेमणुकीला असणार्या काही कर्मचार्यांकडून विविध कारणे दाखवून प्रलंबित ठेवली जात असल्याची तक्रार तालुका आपत्ती निवारण प्राधिकारी यांना देऊन मागील वर्षाची नुकसान भरपाई देण्याची तथा नुकसान भरपाई अडवून ठेवणार्या तलाठ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
तालुयातील वरोली आणि कारली शेत शिवारामध्ये शेती असलेल्या शेतकर्यांना मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठा फटका बसून शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानी संदर्भात शासनाकडून आलेल्या आदेशानुसार पंचनामा होऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात शासनाने घोषित केल्याप्रमाणे निधी जमा करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आलेले असूनही गजानन पाटील, दुर्गादास जाधव, विशाल तोरकडी,Farmers चंद्रकला पाटील आणि मुकुंद भाऊराव गावंडे या आपत्तीग्रस्त शेतकर्यांना या वर्षीचा खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम सुरू झालेला असताना गतवर्षीची नुकसान भरपाईची निधी देण्यास टाळाटाळ येथे नियुक्तीला असलेले तलाठी करीत असल्याची तक्रार संबंधितांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे.नैसर्गिक प्रकोपाने बाधित शेतकर्यांना शासनाकडून मंजूर झालेली निधी न मिळाल्यास संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही बाधित शेतकर्यांकडून निवेदनामध्ये नमूद करण्यात आला आहे.