विविध योजनांचा 581 कोटींचा आराखडा मंजूर

    दिनांक :02-Dec-2023
Total Views |
- जिल्हा नियोजन समितीची बैठक पार
- कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

यवतमाळ, 
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांच्या तब्बल 581 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. या विविध योजनेतून कामे करतांना शेतकर्‍यांना दिलासा देणारी असावी, असे निर्देश पालकमंत्री Sanjay Rathore संजय राठोड यांनी दिले.
 
 
Nirdesh
 
या बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार नीलय नाईक, आ. मदन येरावार, आ. डॉ. अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. नामदेव ससाने, आ. धीरज लिंगाडे, आ. वजाहत मिर्झा, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अदिवासी प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत तीन वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. त्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा समावेश आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील या विविध योजनांचा  पालकमंत्र्यांनी Sanjay Rathore आढावा घेतला.
 
 
नियोजन समितीच्या या बैठकीत या तीनही योजनांसह डोंगरी विकास कार्यक‘माचे 2024-25 या आर्थिक वर्षाचे आराखडे मंजूर करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या 393 कोटींच्या आराखड्याचा समावेश आहे. सोबतच अनुसूचित जाती उपयोजना 84 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना 102 कोटी 66 लाख रुपये तर डोंगरी विकास कार्यक‘माच्या 2 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मंजुरी दिलेल्या या विविध विकास आराखड्यांची एकूण रक्कम 581 कोटी 66 लाख रुपये आहे.
 
 
जिल्हा वार्षिक योजनेसह विविध विकास योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण असावी, तसेच या योजनांमधून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न विविध विभागांनी करावा, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. बैठकीत खासदार, आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा झाली. कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, त्यांना सुचविलेल्या बाबींना प्राधान्य देण्याचेही निर्देश Sanjay Rathore पालकमंत्र्यांनी दिले.