मुंबई,
Arbaaz Khan अरबाज खान पुन्हा एकदा त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. मलायकासोबत घटस्फोटानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता पण नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या पण पुन्हा एकदा 56 वर्षांचा अरबाज प्रेमात पडला आहे. अरबाज खान 24 डिसेंबरला त्याची गर्लफ्रेंड शौरा खानसोबत लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. अरबाज खानने अभिनेत्री मलायका अरोरासोबत ६ वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता.
अरबाजची लेडी लव्ह शौरा खान एक प्रोफेशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत काम करते.Arbaaz Khan शौरा ही रवीना टंडन आणि तिची मुलगी राशाची मेकअप आर्टिस्ट देखील आहे. पण आता ती लवकरच अरबाजसोबत लग्न करणार आहे. अरबाज आणि शौरा यांची पहिली भेट अभिनेत्याच्या आगामी चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर झाली होती आणि तेथून दोघे रिलेशनशिपमध्ये आले. लग्न अत्यंत जिव्हाळ्याच्या पद्धतीने होणार आहे. फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.