गोंदियात दोन दशकांत 294 शेतकरी आत्महत्या

21 Dec 2023 19:57:18
गोंदिया,
Gondia farmer suicides : सततची नापीकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन दशकात जिल्ह्यातील 294 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. या शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाखांपर्यंत मदत दिली जाते. परंतु, यापैकी केवळ 167 शेतकरी कुटुंबांनाच मदत देता आली. विविध कारणाने 127 शेतकरी कुटुंब अपात्र ठरविण्यात आले.
 
Gondia farmer suicides
 
जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गतकाळात Gondia farmer suicides शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. जिल्ह्यात 2002 ते ऑक्टोबर 2023 या काळात तब्बल 294 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कुणी गळफास लावला, कुणी विषारी औषध प्राशन केले, कुणी विहिरीत, तलावात उडी घेत जीवन संपविला. नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, पेरलेले पीक अपेक्षित प्रमाणात घरी न येण्याची शाश्वती, आर्थिक चणचण, बँकेच्या कर्जाचा वाढता डोंगर, कुटंब, मुलाबाळांचे शिक्षण, विवाह, आरोग्याची चिंता शेतकर्‍याला सतावत असते. अशाच चक्रव्युहात सापडलेला शेतकरी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतो. आत्महत्या हे समस्यांचे नाही, तरी मात्र खचलेला शेतकरी हे धाडस करीत असल्याचे दिसून येते.
 
 
मागली दोन दशकांत शेतकर्‍यांनी केलेल्या Gondia farmer suicides आत्महत्येच्या आकडोवारीवर नजर टाकल्यास सन 2002 व 3 यावर्षी प्रत्येकी एक, 2004, 2005 व 2013 या वर्षात प्रत्येकी 6, सन 2006 व 2010 मध्ये 22, सन 2007 मध्ये 19, सन 2008 व 2018 मध्ये 18, सन 2009 मध्ये 12, सन 2010 मध्ये 22, सन 2011 मध्ये 13, सन 2012 मध्ये 10, सन 2014 व 2018 मध्ये प्रत्येकी 17, सन 2015 व 2016 मध्ये प्रत्येकी 31, सन 2019 मध्ये 10, सन 2020 मध्ये 8, सन 2021 मध्ये 16, सन 2022 मध्ये 7 आणि 2023 या वर्षात ऑक्टोबरपर्यंत 3 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती आहे. मदतीसाठी समितीकडे प्रकरण दिले जातात. पात्र कुटुंबाला एक लाख रुपये देण्यात येतात. त्यानुसार 294 पैकी 167 प्रकरणेच समितीने पात्र ठरविली. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पात्र कुटुंबांना आतापर्यंत 1 कोटी 67 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. उर्वरित 127 प्रकरणे विविध कारणे पुढे करून अपात्र ठरविण्यात आले.
 
 
शेतमालाला हमी भाव नसणे, नैसर्गिक संकटे, कृषीविषयक संकटामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे मत अभ्यासक नोंदवतात.
Powered By Sangraha 9.0