गोंदिया,
Janata Sahakari Bank : शहरातील व विदर्भातील अग्रणी, पाच जिल्ह्यांत कार्यन्वीत जनता सहकारी बँक प्रति वर्षी त्यांच्या सभासद व ग्राहकांना बँकेचा प्रसार व नुतन वर्षाच्या शुभेच्छाकरीता दिनदर्शिका भेट म्हणुन वितरित करते. दिनदर्शिकेचे विमोचन आज 21 डिसेंबर रोजी बॅकेचे अध्यक्ष सीए दिनेश दाररीवाल, उपाध्यक्ष राजकुमार तिवारी, संचालक ईश्वरदास असाटी, सीए सुशील अग्रवाल, सुनील केलनका, मुकेश साहु, श्रीधर शिवणकर, शिला तिवारी यांच्या उपस्थीत झाले.
प्रसंगी दाररीवाल यांनी Janata Sahakari Bank बँकेचे सभासद व ग्राहकांना येत्या नुतन वर्षाच्या शुभेच्छा देत बँकेच्या प्रगतीकरीता सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान उपस्थीतांना दिनदर्शिकीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश जोशी यांनी केले. कार्यकमाला बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थीत होते.