तभा वृत्तसेवा
पुसद,
Virangula Yoga Center : महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे नवीन योग वर्गाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक भवन विरंगुळा केंद्र मोतीनगर पुसद या ठिकाणी झाले. या योग केंद्रामुळे मोतीनगर परिसरातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली. हा योगवर्ग मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष योगगुरू विलास पलिकोंडावार व प्रवीण मस्के यांच्या मार्गदर्शनात रोज सकाळी साडेपाच ते सात सुरू राहील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक‘माचे अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार, Virangula Yoga Center तसेच प्रमुख पाहुणे फिजिओथेरपीस्ट डॉ. शैलेश नवथळे, योग शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष शरद बजाज, राज्य मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष विलास पलिकोंडावार, राज्य उपाध्यक्ष मनोज नाईक, राज्य सचिव प्रवीण मस्के, वसंत काळेकर व माजी गटशिक्षणाधिकारी वंदना रायपुरकर मंचावर हजर होते. स्वागत समारंभानंतर मान्यवरांच्या हस्ते योग महर्षी पतंजली ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच दीपप्रज्वलन करून योगवर्गाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर स्वागतगीत व योगगीत किरण गवळी यांनी सुमधुर म्हटले. संचालन मनोज नाईक यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित योग साधकांना मार्गदर्शन करताना डॉ. शैलेश नवथळे यांनी यांनी आजकाल तरुण वर्गात हृदयविकार व त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण खूप वाढत असल्याचे नमूद केले. Virangula Yoga Center त्यासाठी व्यायाम आणि योग अत्यावश्यक आहे असे सांगितले. प्रत्येकाने सकाळी व्यायामासाठी एक ते दोन तास काढणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. हे विकार जीवनशैलीमुळे होतात. त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योगाचा समावेश करणे फार आवश्यक आहे असे ते म्हणाले. तसेच व्यायाम आपल्या प्रकृतीनुसार मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे असेहे सांगितले.
त्यांनी मणक्याच्या विकारावरही मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखविले. आरोग्यासाठी चालणे, धावणे, सायकलिंग, योग, ध्यान व प्राणायाम आवश्यक आहे असे सांगितले. Virangula Yoga Center आभारप्रदर्शन प्रवीण मस्के यांनी केले. कार्यक‘माला योगसाधक प्रा. गोविंद फुके, सुरेश खोसे, विजय खंदारे, दत्तात्रय तगडपल्लेवार, मनोज चांडक, नारायण जाधव, संभाजी गवळी, गणेश पागिरे, प्रशांत अर्धापूरकर, प्रमोद हरणे, अॅड. बाबुराव मस्के, अमोल गवळी, गजानन शेकापुरे उपस्थित होते. तसेच योगप्रेमी कल्पना मस्के, रंजिता कन्नावार, अनू नालमवार, विजया चव्हाण, सुनंदा पवार, ज्योती जाधव, वंदना कदम, योगिता जांबुतकर, दुर्गा गवळी, अलका मंडाले, वैशाली दुबे, माया काळेकर, रजुल शहा, स्वाती हुरकट, स्वरूपा चक्करवार, मोना राठोड, शुभांगी चांडक, वैजू वट्टमवार इत्यादी उपस्थित होते.