हदगाव येथे शासन आपल्या दारी पूर्व नियोजित बैठक

21 Dec 2023 17:08:50
तभा वृत्तसेवा
हदगाव
shasan aaplya daari हदगाव येथे पंचायत समिती सभागृहामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या पूर्व नियोजित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित बैठकीला उपक्रमात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार विनोद गुंडमवार यांची उपस्थिती होती.
 
 
baithak
 
बैठकीच्या वेळी ‘शासन आपल्या दारीङ्क उपक्रम कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या गावांमध्ये कशा पद्धतीने राबवायचे आहे त्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीच्या वेळी संजय डुमणे, आनंद धर्माधिकारी, भास्कर इप्पर, ज्ञानेश्वर चव्हाण, अभिजीत भरणे, सतीश देशमुख, डॉ.प्रवीण qशदे, डॉ.प्रदीप स्वामी, संजय बेतिवार, दिलीप बोबडे, सीडीपीओ अधिकारी उमेश मुदखेड, डॉ. संजय मुरमुरे, गुणवंत काळे, मुख्य अधिकारी नितीन लुंगे,shasan aaplya daari सचिन केंद्रेसह लुकास्तरीय सर्व अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0