तभा वृत्तसेवा
अमरावती,
Amravati Akash Rajput : स्थानिक आझाद हिंद मंडळाच्या वतीने अमरावतीचे अखेरचे लोकप्रिय नगराध्यक्ष स्व. हरिभाऊ कलोती यांच्या स्मृत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या आकाश राजपूतने ‘आझाद श्री’ चा बहुमान पटकावला. तर अकोलाचा सुरेश जडिये बेस्ट पोझर ठरला. त्यांना अनुक्रमे 31 हजार रूपये रोख, 11 हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन तसेच मानाचा बेल्ट देऊन गौरविण्यात आले.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. Amravati Akash Rajput ही स्पर्धा 7 गटात खेळविल्या गेली. पहिल्या 55 ते 60 ते वजन गटामध्ये शिवाजी वाकोडे, जमाल अन्सारी, दत्ता सावरकर, सोहेल खान, सूरज तिवाडे यांनी अनुक्रमे प्रथम, व्दिती, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला. दुसरा गट 60 ते 65 किलोमध्ये मोहंमद शहजाद, शेख सलीम, शिवकुमार चव्हाण, सौरभ गणवीर व दीपक धानोरकर यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक प्राप्त केले. तिसरा गट 65 ते 70 किलोमध्ये सय्यद मोईद्दिन, प्रीतम साहू, योगेश विश्वकर्मा, इरफान खान व राजा ईवनाते यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक पटकावले. चौथा गट 70 ते 75 किलोमध्ये मोहम्मद आवेश, अब्दुल फारुख, साकिब खान व ओम बडवाइक यांनी क्रमांक पटकावले. पाचवा गट 75 किलो ते 80 किलोमध्ये योगेश शेंडे, राहुल सरोदे, सर्वेश जडीये, रवींद्र कुंभरे व बॉबी साहू यांनी 1 ते 5 क्रमांक पटकाविले.
सहावा गट 80 किलोच्या वर होता. यामध्ये Amravati Akash Rajput आकाश राजपूत, मोहमद तनवीर, सर्वेश साहू, आशीष साहू व तोसिफ खान यांनी 1 ते 5 क्रमांक पटकाविले. सातव्या मास्टर्स गटात नरेश पोकळे, श्रीकांत आडे, सय्यद मोह्ममद, संतोष बंधाते व हरिश जडीये यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक पटकावले. सर्व गटातील प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवे स्थान प्राप्त करणार्या खेळाडूंना अनुक्रमे 10 हजार, 8 हजार, 6 हजार, 4 हजार व 2 हजार रूपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला डॉ. सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, मिलिंद चिमोटे, बबलू शेखावत, दिनेश बूब, भैय्या पवार, डॉ. अंजली ठाकरे, सुनील खराटे, पोलिस निरीक्षक टाले यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला.
बक्षीस वितरण सोहळा मंडळाचे उपाध्यक्ष माजी खासदार अनंत गुढे, माजी महापौर विलास इंगोले, माजी आमदार प्रदीप वडनेरे, नंदू गुंबळे, दिलीप दाभाडे, डॉ. किशोर फुले, दिलीप कलोती, ज्ञानेश्वर हिवसे, भूषण पुसतकर, सुरेश रतावा, गजू राजगुरे, अनिकेत ढेंगले, प्रमोद इंगोले, रफिक भाई, किशोर कलोती व विदर्भ बॉडी बिल्डर असो. चे सर्व पदाधिकारी यांचे हस्ते झाला. Amravati Akash Rajput कार्यक्रमाचे प्रासताविक स्पर्धा आयोजक विलास इंगोले यांनी केले तर संचलन संजय मुचळंबे यांनी केले. ,
शाळकरी मुलांच्या सहलीही वाढल्या