सिफर प्रकरणात इमरान खान यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा...

    दिनांक :22-Dec-2023
Total Views |
इस्लामाबाद,
Imran Khan : सर्वोच्च न्यायालयाने शुक‘वारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
 
 
Imran Khan
 
 
अहवालानुसार, सिफर प्रकरण राजनयिक दस्तावेजांशी संबंधित आहे. या दस्तावेजात इमरान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याची अमेरिकेकडून धमकी देण्यात आली होती, असा पाकिस्तान तहरिक- ए- इन्साफचा (पीटीआय बराच काळ समज होता.
 
13 डिसेंबर रोजी इमरान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसर्‍यांदा दोषी ठरवल्यानंतर, विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात अदियाला जिल्हा कारागृहात नव्याने खटला सुरू केला. इमरान खान आणि कुरेशी यांना या प्रकरणात 23 ऑक्टोबर रोजी प्रथम दोषी ठरवण्यात आले होते. या दोघांनी स्वतःला निर्दोष घोषित केले होते.