जादूगार पी. सी. सरकारची ईडीकडून चौकशी

चिटफंड घोटाळ्यात सहभाग

    दिनांक :22-Dec-2023
Total Views |
कोलकाता,
Magician P. C. Sarkar : पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या आणि गुंतवणूकदारांची 790 कोटी रुपयांनी फसवणूक झालेल्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने प्रख्यात जादूगार पी. सी. सरकार (ज्युनियर) यांची शुक‘वारी चौकशी केली.
 
P. C. Sarkar
 
 
जादूगार सरकार शुक‘वारी दुपारी सॉल्ट लेकमधील ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेच ईडीच्या अधिकार्‍यांनी पिनकॉन ग‘ुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या केंद्रीय एजन्सी म्हणून ओळख असलेल्या दोन कंपन्यांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली.
ईडीच्या अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही सरकार यांची चिटफंड प्रकरणासंदर्भात चौकशी करीत आहोत. त्यांचा कोणत्याही प्रकारे सहभाग होता की नाही, हे आम्हाला शोधायचे आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने टॉवर ग‘ुपच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याला ताब्यात घेतले होते आणि त्याची चौकशी करताना सरकारचे नाव समोर आले होते. 2021 मध्ये सीबीआयने याच प्रकरणात जादूगार सरकार यांच्या बालीगंज निवासस्थानाची झडती घेतली होती.