Died This Year : 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. जाणून घेऊ या अशा स्टार्सबद्दल, ज्यांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला.
चित्रा नवाथे
अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे 11 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रा नवाथे यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी 1952 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
सुनील होळकर
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अभिनेते सुनील होळकर यांचे 13 जानेवरी रोजी निधन झाले. ते अवघ्या 40 वर्षांचे होते. त्यांनी अन्य काही मालिकांमध्येही भूमिका साकारली होती.
समीर खाखर
अभिनेते समीर खाखर यांचे 15 मार्च रोजी निधन झाले आहे. समीर यांनी ‘नुक्कड’ या 1990च्या दशकातील प्रसिद्ध मालिकेत ‘खोपडी’ ही भूमिका साकारली. बोरिवली येथील राहत्या घरी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सतीश कौशिक
अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
भालचंद्र कुलकर्णी
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी 18 मार्च रोजी सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले होते.
वैभवी उपाध्याय
‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे मे महिन्यात एका कार अपघातात निधन झाले. त्यावेळी त्या अवघ्या 32 वर्षांच्या होत्या. हिमाचल प्रदेशात त्यांच्या कारला अपघात झाला होता.
शांता तांबे
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे 19 जून रोजी 90 व्या वर्षी निधन झाले. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. शांता तांबे यांनी नाटकांमध्ये काम करून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला होता.
जयंत सावरकर
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे जुलै महिन्यात निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.
भैरवी वैद्य
अभिनेत्री भैरवी वैद्य यांनी वयाच्या 67 व्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी हळहळली होती. जवळपास 45 वर्षे त्या मनोरंजनक्षेत्रात काम करीत होत्या.
सीमा देव
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. 81 वर्षीय सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
रिओ कपाडिया
‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे 14 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिल चाहता है, चक दे इंडिया, हॅप्पी न्यू इअर, मर्दानी यासार‘या चित्रपटांमध्ये रिओ कपाडिया यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
दिनेश फडणीस
‘सीआयडी’ फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. दिनेश फडणीस यांनी सीआयडी या मालिकेत इंस्पेक्टर फ‘ेड्रिक्स ही भूमिका साकारली.
ज्युनियर मेहमूद
अभिनेता नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद यांचे 8 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी मुंबईच्या खार येथील घरात वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.