नागपूर,
Granth Dindi रमानगर येथील एच एस महात्मे संस्कार विहार स्कूल आणि संस्कृत भारतीच्या बालकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने गीता जयंती निमित्त गीता ग्रंथ दिंडी काढण्यात आली.मिरवणुकीच्या संपूर्ण वेळात विद्यार्थ्यांनी गीतेचा १२आणि १५ व्या अध्यायांचे गायन केले. दिंडी शाळा ते रेणुका माता मंदिरापर्यंत मिरविण्यात आली होती.
परिसरातील नागरिकांनी या दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद दिला .Granth Dindi सर्वांनी मुलांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करण्यात आले.या सोहळ्यात शाळेतले सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाग घेतला होता. शाळेच्या संचालिका रजनी काळमेघ या दिंडी यात्रेत सामील झाल्या होत्या.
सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र.