तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
State level agricultural exhibition डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग व आत्मा प्रकल्प, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन 27 ते 29 डिसेंबर दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ क्रिडांगण, अकोला येथे करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या कृषि प्रदर्शनीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीत फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि अभियांत्रिकी इत्यादी विभागाची दालने तसेच इतर संलग्न संस्थासह, कृषि निविष्ठा व कृषि औजारे यांची दालने सुध्दा राहणार आहे. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी 2 ते 4 वाजता शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद, प्रगतीशील शेतकर्यांचे मनोगत व मान्यवरांचे संबोधनाचे आयोजन करण्यात येत आहे. State level agricultural exhibition या प्रदर्शनीतील कृषि पुरक व्यवसाय दालने तथा कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने प्रदर्शनीस भेट देणार्या शेतकर्यांसाठी प्रेरणादाई तसेच शेतकर्यांचे मनोबल उंचविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. ही दालने या कृषि प्रदर्शनीतील मुख्य आकर्षण आहे.
या शिवाय गट शेती, करार शेती, स्वयं सहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषि आधारीत उत्पादने, शेतकर्यांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादींची अभिनव दालने सुध्दा उपलब्ध राहणार आहेत. एकंदरीत या प्रदर्शनीत 300 च्या जवळपास दालने उपलब्ध राहणार असून ही कृषि प्रदर्शनी राज्यातील शेतकर्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सर्व शेतकरी, कृषि क्षेत्राशी निगडीत मंडळीनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी केले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी कृषि प्रदर्शनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी केले आहे.