तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Virtual registration of farmers शासनाने खरीप पणन हंगामाअंतर्गत राज्यात किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी व रागी या भरडधान्य खरेदीसाठी शेतकर्यांची आभासी नोंदणीसाठी पाच खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली आहे. यात महागाव तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे.

शेतकरी नोंदणी करताना या हंगामापासुन ज्या शेतकर्यांचा सातबारा आहे त्याच शेतकर्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल अॅपपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल अॅपव्दारे अपलोड करता येणार आहे. ज्या शेतकर्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकर्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करुन नोंदणी करावी. Virtual registration of farmers ज्या शेतकर्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्या शेतकर्यांनी नोंदणीसाठी आपल्या तालुक्यातील दिलेल्या खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहुन किंवा स्वतः मोबाईल अॅपव्दारे लाईव्ह फोटो अपलोड करण्यात यावा. भरडधान्य ज्वारी, मका, बाजरी व रागी खरेदीकरिता शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी 31 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार असुन प्रत्यक्षात खरेदी 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.