- सर्व घटकांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा : आ. अशोक उईके
राळेगाव,
तालुक्यातील वडकी येथे शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिर पार पदले. शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन आमदार Ashok Uike डॉ. अशोक उईके यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ या महाआरोग्य शिबिराचा लाभ शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ वडकी परिसरात सर्व समाज घटकांतील नागरिकांनी घ्यावा, असे आपल्या भाषणातून आ. डॉ. उईके यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, समाजसेवी संजय काकडे, ठाणेदार विजय महाले व इतर मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विविध योजनांचे धनादेश, महिला बचतगटांना धनादेश, लाभार्थ्यांना काही योजनांचे साहित्य आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नंतर आमदारांनी शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून घेऊन सर्वांच्या समस्या सोडवणार असे आश्वासन दिले. शिबिरात पीएम किसान केवायसी, पीएम किसान नोंदणी, आधार कार्ड अपडेट, आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नवीन शिधापत्रिका अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, पंचायत, वन विभाग, संजय गांधी निराधार, अन्न पुरवठा व निवडणूक विभाग, सेंट्रल बँक, महावितरण व इतर विभागांचे टेबल लावले होते.
Ashok Uike : महिला बचतगट आणि अंगणवाडी कर्मचार्यांनी अनेक वस्तू व पदार्थांचे स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉलवर आमदारांनी जाऊन पाहणी केली. तसेच महाआरोग्य शिबिरामध्ये मेघे सावंगी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी व प्रथमोपचार केले. शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर आजार असणार्या रुग्णांना मेघे सावंगी हॉस्पिटल येथे भरती होण्याकरिता सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन महिला बालविकास अधिकारी सागर विटाळकर, प्रास्ताविक तहसीलदार अमित भोईटे, आभारप्रदर्शन गटविकास अधिकारी केशव पवार यांनी केले. यावेळी मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज भोयर, सरपंच शैलेश बेलेकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, सर्व सरपंच, सर्व पत्रकार उपस्थित होते. शिबिरासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य, महसूल, पोलिस, पंचायत व शिक्षण विभाग कर्मचारी, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत वडकी तसेच सर्व विभागांचे कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. वडकी परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.