रॉयल एनफिल्डच्या ‘बुलेट’ची विक्री प्रचंड वाढली

    दिनांक :24-Dec-2023
Total Views |
- हंटरची विक्री मात्र घटली
 
नवी दिल्ली, 
Royal Enfield : रॉयल एनफिल्ड आणि या कंपनीचे आयकॉनिक मॉडेल ‘बुलेट’ची चर्चा नेहमीच असते. फार पूर्वीपासून हिंदीमध्ये म्हटले जायचे- ‘लेट लेना लेकीन बुलेटही लेना’, आता हे वाक्य शब्दशः खरे ठरत आहे. लोकांच्या बुलेटवर उड्या पडत आहेत. कंपनीने नोव्हेंबर महिन्यात 75 हजारांपेक्षा जास्त बाईक्सची विक्री केली. यात वार्षिक 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यात बुलेट मॉडेलची विक्री सर्वाधिक आहे. या वर्षी लाँच केलेल्या नवीन बुलेट 350 च्या विक्रीत वार्षिक 41 टक्के वाढ झाली आहे, तर हंटर 350 च्या विक्रीत घट झाली आहे. 650 ट्विन्सच्या वार्षिक विक्रीत सुमारे 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. लोक रॉयल एनफिल्डच्या 650 सीसी बाईक्सला मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
bulet
 
Royal Enfield : रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक 350 यंदा देखील टॉपवर आहे. गेल्या महिन्यात 30, 264 लोकांनी ही बाईक खरेदी केली. क्लासिक 350 ची विक्री 13 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात मासिक विक्रीत 5 टक्क्यांची घट दिसून आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफिल्डची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक बुलेट 350 होती, जी 17,450 लोकांनी खरेदी केली होती. त्यापाठोपाठ हंटर 350 बाईक 14,176 ग्राहकांनी विकत घेतली.
 
 
 
मीटिअर-350 रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय बाईक्सच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे, जी गेल्या महिन्यात 8,051 लोकांनी खरेदी केली होती. या बजेट क्रूझर बाईकच्या विक्रीत मासिक 20 टक्क्यांनी घट झाली आहे. यानंतर 650 ट्विन, म्हणजे कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650, ज्यांनी गेल्या महिन्यात 2,112 युनिट्सची विक्री केली. या दोन शक्तिशाली बाईक्सच्या विक्रीत वार्षिक सुमारे 66 आणि मासिक 21 टक्के वाढ झाली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन सीरिजच्या बाईक 1,814 लोकांनी खरेदी केल्या होत्या, ज्या यंदा मासिक आणि वार्षिक घट दर्शवतात. रॉयल एनफिल्डची सर्वांत कमी विक्री होणारी मोटारसायकल सुपर मीटिअर-650 आहे, जी 1,270 लोकांनी विकत घेतली आणि ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत तिची विक्री 42 टक्क्यांनी कमी झाली आहे.