वेध
- अनिरुद्ध पांडे
Shri Dutt Jayanti 2023 आज मार्गशीर्षातील पौर्णिमा. श्री दत्तात्रेयांचा जयंती दिन म्हणून आपल्या देशात साजरा करतात. भगवान विष्णूंच्या २४ अवतारांपैकी एक अवतार दत्तात्रेय मानला जातो. श्री दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र. त्यांच्या जन्माविषयी एक पौराणिक कथा आहे. महर्षी नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांच्या पत्नींना अनसूयेच्या सतीत्वाविषयी खूप गौरवाने सांगितले. Shri Dutt Jayanti 2023 अनसूया म्हणजे जिला कोणाचीही असूया, द्वेष वाटत नाही ती. अशा अनसूयेविषयी त्या तिघींच्या मनात असूया निर्माण झाली. त्या तिघींनी अनसूयेचे सत्त्वहरण करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या पतींना, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेशांना अतिथिवेशात तिच्याकडे पाठविले. हे तिघे आश्रमात पोहोचले त्यावेळी अनसूया एकटीच होती. ‘अतिथी देवो भव'नुसार तिने या अतिथींचे स्वागत केले. त्यांना भोजनाची विनंती केली. Shri Dutt Jayanti 2023 या तिघांनी भोजनाचा स्वीकार करण्यासाठी, ‘तुला विवस्त्र होऊन आम्हाला वाढावे लागेल' अशी अट टाकली. अतिथींना विन्मुख पाठविणे योग्य नसल्याच्या संस्कारांमुळे अनसूयेने पती-स्मरण करून या तिन्ही अतिथींवर तीर्थ शिंपडले.

त्याच क्षणी या तिघांचेही बालकांत रूपांतर झाले. त्यानंतर अनसूयेने त्यांची अट पूर्ण करून मातृत्वाच्या वात्सल्याने त्यांना जेवू घातले. तिच्या मातेच्या ममतेने तिन्ही बालके संतुष्ट झाली. Shri Dutt Jayanti 2023 पण तिकडे भगवान ब्रह्मदेवांची सावित्री, विष्णूंची रमा आणि शंकराची पत्नी उमा, या आपले पती परतले नाहीत म्हणून काळजीत पडल्या. सावित्री, रमा आणि उमा शेवटी आपल्या पतीच्या शोधार्थ अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. त्या ठिकाणी त्यांना चमत्कार पाहायला मिळाला. अनसूयेच्या सतीत्वाच्या तेजामुळे आपले पती बालक झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी अनसूयेची क्षमा मागून आपल्या पतींना पूर्ववत् करण्याची विनवणी केली. Shri Dutt Jayanti 2023 त्यांची अवस्था पाहून अनसूयेने त्या तिन्ही बालकांचे ब्रह्मा, विष्णू, महेशांमध्ये पूर्ववत् रूपांतर केले. अनसूया सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे तिने या तिघांनीही तिच्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. देवांनी हे मान्य केले. त्याप्रमाणे अनसूयेला दत्तात्रेय हे बाळ लाभले. या दत्तामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशांचे अंश एकत्रितपणे असल्याचे मानले जाते. श्री ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली, श्री विष्णू पालन करीत आहे आणि श्री शंकर लय करणार आहेत. Shri Dutt Jayanti 2023 त्यामुळे श्री दत्तात्रेयांची उपासना म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिशक्तीची उपासना होय, अशी मान्यता आहे.
तसेच ब्रह्माचा रजोगुण, विष्णूचा सत्त्वगुण आणि शिवाचा तमोगुण यांचा संयोग दत्तामध्ये झाला आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाला मोठी परंपरा आहे. दत्त उपासनेला दत्त संप्रदायाचे मूळ प्रणेते नृसिंह सरस्वती यांनी संप्रदायाचे रूप दिले. दत्त व नाथ या दोन्ही संप्रदायांनी दत्ताला आदर्श गुरू मानले आहे. Shri Dutt Jayanti 2023 जनार्दनस्वामी, संत एकनाथ, मुक्तेश्वर, निरंजन रघुनाथ, माणिक प्रभू, स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती हे दत्तसंप्रदायाचे पाईक मानले जातात. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा' या दत्ताच्या आरतीचे रचयिता संत एकनाथच आहेत. श्री दत्तात्रेयाचे स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. कुठे एकमुखी, चतुर्भुज मूर्ती आहेत. पण प्रामुख्याने त्रिमुखी आणि सहा हातांच्या दत्तमूर्तीच असतात. Shri Dutt Jayanti 2023 या दत्ताच्या मागे गाय आणि बाजूला चार श्वान नेहमी असतात. गाय हे पृथ्वी व कामधेनूचे आणि चार श्वान हे वेदांचे प्रतीक मानले जातात. कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते. दत्तमूर्तीतील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.
शंख आणि चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे. त्रिशूळ आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. तसेच झोळी ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो, असे मानतात. त्यातूनच दत्तांच्या आरतीत संत एकनाथांनी ‘मी तू पणाची झाली बोळवण,' असे म्हटले असावे. शंकराची पत्नी उमा, दत्तात्रेय हा देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्री ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय. Shri Dutt Jayanti 2023 दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांची संधी होऊन दत्तात्रेय हे नाव या मुलाला मिळाले. पण दत्तात्रेय या देवतेला आणखी काही नावांनी ओळखले जाते. दत्तगुरू, अवधूत, दिगंबर, श्रीपाद, वल्लभ अशाही नावांनी या देवतेचा परिचय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्ग हाच आपला सर्वात मोठा गुरू आहे, हे दत्तांनी स्पष्ट केले. उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहिले तर निसर्गाची महती लक्षात येईल, अशी त्यांची शिकवण आहे. Shri Dutt Jayanti 2023 आज एकविसाव्या शतकात दत्तात्रेयांची ही शिकवण आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.
९८८१७१७८२९