अखंड कर्मयोगाची प्रेरणा गीतेमधून मिळते

25 Dec 2023 16:11:53
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात गीता-पारायण
नागपूर,
Prof. Hareram Tripathi आपल्या सर्वांना अखंड कर्मयोगाची प्रेरणा गीतेमधून मिळते. भारतीयांच्या जीवनाचे अभिन्नअंग असलेली गीता ही आपल्या सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले. विश्वविद्यालयाच्या भारतीय दर्शन विभागाद्वारे गोळवलकर गुरुकुलम् परिसरात गीता जयंती निमित त्रिदिवसीय गीता पारायण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
 
 
Prof. Hareram Tripathi
 
यावेळी प्रो. हरेकृष्ण अगस्ती, प्रो. कलापिनी अगस्ती प्रामुख्याने उपस्थित होते. या सामूहिक पारायणात विश्वविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य नागरिकांनी सहभाग घेतला. Prof. Hareram Tripathi त्रिदिवसीय गीता पारायणाची सांगता गीतेच्या आरतीने करण्यात आली. सामूहिक पारायणाचे नेतृत्त्व डॉ. रेणुका करंदीकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन डावरे, मधुसूदन पेन्ना यांनी केले
Powered By Sangraha 9.0