तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Prof. Anant Pandey येथील सुसंस्कार विद्या मंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म्हणून निवृत्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते अनंत पांडे, सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र हॉकी महासंघाच्या उपाध्यक्ष मनीषा आकरे उपस्थित होते. सुसंस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा, उपाध्यक्ष सुनील गुगलिया, सचिव संजय कोचे, कोषाध्यक्ष मनोज लुणावत, सदस्य प्रवीण लुणावत, गणेश गुप्ता, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक उषा कोचे, घनश्याम गुप्ता, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष बालाजी वाकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक उषा कोचे यांनी केले. शालेय प्रार्थना ‘हम को मन की शक्ती देना', श्लोकपठण व ध्यानाद्वारे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मोठ्या विद्याथ्र्यांनी सूर्यनमस्कार व मनोऱ्याचे तर लहान विद्याथ्र्यांनी समूह कवायत अशा अनोख्या शारीरिक कसरतींचे सादरीकरण केले. Prof. Anant Pandey क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लंगडी अशा विविध सांघिक खेळांचा शाळेतील चारही गृहांसाठी आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेटच्या प्रकारात ब्लू हाऊस, कबड्डी व खो-खो प्रकारात येलो हाऊस, लंगडीत ग्रीन हाऊसचे संघ अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यांमध्ये ‘सुसंस्कार चषकाचेङ्क मानकरी ठरले. तसेच विविध खेळांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांचे मनोरंजन करण्यात आले. मार्गदर्शन करताना प्रा. अनंत पांडे म्हणाले, विद्याथ्र्यांनी अभ्यासासह जीवनात खेळालासुद्धा महत्व द्यावे. तसेच विद्याथ्र्यांना क्रीडा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी व मेहनतीचे महत्व त्यांनी पटवून दिले. प्रमुख पाहुण्या मनीषा आकरे यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांद्वारे विद्याथ्र्यांना भविष्यातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी निलेश शेटे, विनोद जाधव, मोहित जयस्वाल, रोशन माहुरे व इतर सर्व शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दीपाली कैतिकवार, मेघा केवटे यांनी केले. शालेय वार्षिक वृत्तांत वाचन अक्षता मारडकर, तर आभारप्रदर्शन राखी नाहाते यांनी केले.