वाशीम,
Indian Student Parliament : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसद १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे तेरावे वर्ष आहे.अशी माहिती एमआयटी चे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी १३व्या Indian Student Parliament भारतीय छात्र संसदेसाठी घंटानाद करण्यात आला.या वेळी कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. महेश थोरवे उपस्थित होते. १३व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वा. होईल. देशाची माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, यूके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाद देसाई, माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा.राम चरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता समारोप होईल. याशिवाय विशेष ‘युथ टू युथ कनेट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.
राज्य सभेचे खासदार व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, अध्यात्मिक गुरू स्वामी मुकुंदानंद, प्रसिद्ध इतिहासकार आणि स्तंभलेखक डॉ.विक्रम संपत, राज्य सभा टिव्हीचे प्रमुख संपादक गुरूदिप सिंग सप्पल, उद्योजक रणवीर अल्लाबदिया, Indian Student Parliament भारतीय मानवधिकार कार्यकर्ता डॉ.स्नेहल रशीद, कवी मनोज मुंतशीर, राज्य सभेचे खासदार मनोज कुमार झा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य व अभिनेत्री खुशबू सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग, डॉ.टेसी थॉमस आणि राज्य सभेच्या सदस्य डॉ .फौजिया खान यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्या या १३व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.
जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या Indian Student Parliament छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.