आनंदी राहणे साधी गोष्ट, पण साधे राहणे कठिण : प्रंचित पोरेड्डीवार

प्रंचित पोरेड्डीवार यांचा वाढदिवस साजरा

    दिनांक :26-Dec-2023
Total Views |
गडचिरोली, 
Pranchit Poreddiwar : काही माणसे माया जमविणारी असतात, तर काही माणसे मायाळू असतात. आनंदी राहणे ही साधी गोष्ट आहे. मात्र साधे राहणे हे सहज शक्य नसून कठिण गोष्ट आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले आहे. दत्त जयंतीच्या पर्वावर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार कृष्णा गजबे यांचा गौरव तसेच प्रंचित पोरेड्डीवार यांचा वाढदिवस आणि वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले, या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
 
Pranchit Poreddiwar
 
आमदार कृष्णा गजबे यांच्या साध्या व्यक्तीमत्वाबद्दल बोलताना पोरेड्डीवार म्हणाले. गजबे यांच्या वागण्यात मागिल 10 वर्षात इंचभर सुद्धा बदल झालेला नाही. अतिशय प्रामाणिक व्यक्तीमत्व असून एका योग्य व्यक्तीमत्वाला आदर्श लोकप्रतिनिधीचा पुरस्कार मिळाल्याचे ते Pranchit Poreddiwar म्हणाले. शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना धनादेश वितरित करताना त्यांनी वन्यप्राणी आणि मानवाचा संघर्ष थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
 
 
यावेळी विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी अतिशय साधे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार Pranchit Poreddiwar यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी खासदार अशोक नेते, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अनिल पोहणकर, बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.