सफाई कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    दिनांक :26-Dec-2023
Total Views |
वाशीम,
Sweepers Workers Andolan : सफाई कामगार या पदावर कार्यरत असलेले अनुसूचित जातीसह अन्य सर्व साधारण वर्गातील सर्व सफाई कामगार कर्मचारी यांचे वारसांना वारसा हक्क लाभ देवून त्यांचा आर्थीक विकास होण्याकरीता सफाई कामगार म्हणून नौकरीत सामावून घेण्यासाठी शासनाने त्यांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडावी या मागणीसाठी अ.भा. मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे यांच्या नेतृवात सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
 
Sweepers Workers Andolan
 
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे समितीचे शिफारशी नुसार १९७२ पासुन वारंवार अनेक शासन परीपत्रक लागु करण्यात आले. त्यातील अनेक कायदे Sweepers Workers Andolan  सफाई कामगार यांचे हिताचे आहेत. परंतु, काही शासन निर्णय भरती प्रक्रिया किचकट होवुन वारंवार सफाई कामगार यांचे वारसाना त्रास होत आहे. २४ फेब्रुवारी २०२३ चे शासन परीपत्रकाची अंमलबजावणी सुरू असतांना वाशीम येथील मुख्याधिकारी यांच्याकडे अर्जदारांनी निरंतर पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी त्या मागणीची दखल घेतली नाही शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जातीतील सर्वाना लाभ देण्याचे प्रावधान असतांनाही नगर परीषदेचे निरागसतेमुळे व त्रास देण्याचे वर्तनामुळे अनेकांना नौकरीपासून वंचित राहावे लागत आहे.
 
 
औरंगाबाद उच्च न्यायालयाचे खंडपिठाने दिलेले स्थगीतीमुळे अनुसुचित जातीतील मातंग, मांग, महार, ढोर, चांभार या जातीतील लोकांना सुध्दा सफाई कामगार चे नौकरीचे लाभापासुन वंचित ठेवण्यात आलेले आहे. वास्तविक वरील नमुद जातींचा पुर्वापार अस्वच्छ व्यवसाय असतांना, केवळ मेहतर, भंगी या जातींना लाभ दिल्या जात असुन एकाच प्रवर्गातील इतर जातींवर मोठा अन्याय होत आहे. तरी अनुसूचित जातीसह अन्य सर्वसाधारण वर्गातील सर्व जातींना सरसकट सफाई कामगार वारसा हक्काचा लाभ मिळण्यासाठी वि. उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथील प्रकरणात मध्ये शासनाने आमची बाजू भक्कमपणे मांडावी अशी त्यांनी मागणी केली आहे. या Sweepers Workers Andolan धरणे आंदोलनामध्ये संजय वैरागडे, उषाताई बलखंडे, धोंडू कंकाळ, केशव कुचेकर, प्रविण खडसे, कैलास आमटे, अर्जून तोमर, समाधान सिरसाट यांच्यासह अन्य सफाई कामगारांचा समावेश आहे.