मुंबई,
Ram Mandir inauguration : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरू झाला. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठविण्यात आले. मात्र, व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नावच नाही. तिथेच, राज ठाकरे व्हीव्हीआयपी यादीत आहेत.
अयोध्येतल्या Ram Mandir inauguration राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आली आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाहीत, मात्र राज ठाकरे आहेत, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केले. उद्धव ठाकरे फक्त पहिल्या टर्मचे आमदार आहेत तसेच राम मंदिरावरून टीका करणार्यांना बोलावण्याचे कारण काय, असे त्यांनी सांगितले.