सोनोग्राफी मशिन दोन महिन्यांपासून बंद

26 Dec 2023 19:11:49
गोंदिया, 
Gangabai Women's Hospital : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थिरावून देखील जिल्ह्यातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दिवसाकाठी जवळपास 50 तर शेजारील बालाघाट जिल्ह्यात 10 ते 15 गर्भवती महिला येतात. गर्भवती महिलांसाठी अत्यंत गरजेची असलेली सोनोग्राफी मशिन गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करावी लागत आहे.
 
Gangabai Women's Hospital
 
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. डॉक्टर्स, नर्स, औषधांचा तुटवडा हा नेहमीचाच विषय झाला आहे. खासगीत रुग्णांची लूट होत आहे. Gangabai Women's Hospital जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गोरगरीब जनता उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात जातात. त्यातच विशेषतः महिला प्रसुतीकरिता सरकारी रुग्णालयानांच पसंती देतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अद्यापही कंत्राटी सोनोग्राफी तज्ञ मिळाला नाही.
 
 
बाई गंगाबाई रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष गेल्या दोन महिन्यांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना सोनोग्राफीकरिता बाहेर पाठविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक लोकेश यादव यांनी सांगितले की, Gangabai Women's Hospital शासन एकीकडे जननी सुरक्षा योजना राबवून महिलांना सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र येथील रुग्णालयात सोनोग्राफी मशिन दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोनोग्राफी मशिन तत्काळ सुरु करण्यात यावी.
Powered By Sangraha 9.0