मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान खाजगी शाळांसाठी सुवर्णसंधी : कादर शेख

27 Dec 2023 18:16:37
गोंदिया, 
Mazi Shala-Sundar Shala Mission : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान म्हणजे खाजगी शाळांसाठी सुवर्णसंधी आहे. अभियानचा सर्व शाळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले.

Mazi Shala-Sundar Shala Mission 
 
मुख्यमंत्री Mazi Shala-Sundar Shala Mission माझी शाळा सुंदर शाळा अभियानाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची बैठक येथील पुंजीभाई पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेख यांनी परीक्षा पे चर्चा, पवित्र पोर्टल भरती, स्वच्छता मॉनिटर, माझी शाळा माझी परसबाग, महावाचन उत्सव, मानव विकास सायकल वाटप इत्यादी विषयांवरही मार्गदर्शन केले. चर्चा व शंका समाधान केले. उपस्थित मुख्याध्यापक यांना अडचणी विचारुन त्यांचेही निराकरण केले.
 
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाच्या सहाय्यक सचिव कल्पना लांडे यांनी यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. समग्र शिक्षाचे जिल्हा प्रोग्रामर नितेश खंडेलवाल यांनी वैध आधार, एसडीएमएस, ड्रॉप बॉक्समधील प्रलंबित कामकाज याविषयी मार्गदर्शन केले. Mazi Shala-Sundar Shala Mission प्रसंगी राष्ट्रीय वीर बाल दिवसाचे औचित्य साधून वीर सुपूत्र जोरावरसिंह, फतेहसिंह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी डी. बी. दिघोरे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0