बस वेळेवर न आल्यामुळे विध्यार्थांची गैरसोय

27 Dec 2023 20:02:38
मुलचेरा,
Students Bus : महाराष्ट्र शासन एकीकडे महिला सशक्तीकरन अभियान राबवीत आहे. मात्र, बस अभावी मुलचेरा येथील विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. आपली मुले शिकली पाहिजे हे आई वडिलांचे स्वप्न असतात. गाव पातळीत शिक्षण प्राथमिकपर्यंतचे असते. 1 ली ते 4 थ्या वर्गापर्यंतचे शिक्षण होत असते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थांना तालुका किंवा जवळ असलेल्या मोठ्या गावात शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. आई-वडील पोटाची झीज करून आपल्या मुला बाळाला पैशाची कमी न व्हावी, शिक्षणात होणार्‍या खर्चात कमतरता होऊ नये म्हणून कामे करत असतात.
 
Students Bus
 
आपला मुलगा उत्तम शिक्षण घेऊन नोकरीवर लागावे हे त्यांचे एक मात्र स्वप्न असते. याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचातील मुलचेरा या तालुका Students Bus मुख्यालयातील शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. शाळेची वेळ सकाळी 10 ते यायंकाळी 5 वाजेपर्यंत असते. शाळेची सुट्टी झाली की विद्यार्थी घरी जाण्यासाठी बस्थानकात जातात. मात्र तासनतास वाट बघून सुद्धा बसचा पत्ताच लागत नाही. शासनाच्या वतीने मुलींसाठी मानव विकास अंतर्गत बसची सेवा आहे. मात्र सेवाच वेळेवर मिळत नाही. शाळेची सुट्टी सायंकाळी 5 वाजता होते. मात्र मुलचेरा बसस्थानकात कधी-कधी रात्री 9 वाजले तरी बस येत नाही. बस वेळेवर न आल्यामुळे विध्यार्थी घरी कधी जाणार आणि अभ्यास कधी करणार हाच प्रश्‍न निर्माण होत आहे.
 
 
आई-वडील कष्ट करून मुलांना शिकवत असतात. मुलेच वेळेवर घरी न आल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम तर होत आहे. तसेच उशिरापर्यंत मुले घरी परत पन आल्याने पालकांच्या चिंतेतही वाढ होत आहे. Students Bus बसेस वेळेवर न आल्याने मागीलवर्षी 22 सप्टेंबर 2022 रोजी नेताजी शुभाषचंद्र चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही दिवस बससेवा वेळेवर देण्यात आली. मात्र, परत तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याकडे लक्ष देऊन बस सेवा सुरळीत करावी अशी मांगणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0