मालेगाव,
Vrishali Mahajan : रिसोड येशील वृषाली सिद्धिविनायक महाजन हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या सब रजिस्टर (उपनिबंधक) पदाच्या परीक्षेत राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. Vrishali Mahajan वृषाली च्या या यशाबद्दल जिल्हाभरातून तिचे कौतुक केले जात आहे.
वृषाली महाजन Vrishali Mahajan हिचे शिक्षण रिसोड येथील दि आर्य शिक्षण संस्था द्वारा संचालित भारत माध्यमिक शाळेत झाले. तिने मार्च २०१२ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेऊन यश संपादन केले होते तर फेब्रुवारी २०१४ मध्ये इयत्ता बारावी मध्ये सुद्धा ८० टक्के गुण घेतले होते त्यानंतर तिने संभाजीनगर येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले तसेच संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत येणार्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्या अंतर्गत तिने २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी राज्यातून महिला गटातून सातवा क्रमांक मिळवला तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा चा नुकताच जाहीर झालेला निकालामध्ये सब रजिस्टर ऑफिसर व एसटीआय या परीक्षेमध्ये वृषालीने राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे तिचे तालुयात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक केले जात आहे. Vrishali Mahajan वृषालीने तिचे यशाचे श्रेय आई - वडील व गुरुजनांना दिले आहे.