तभा वृत्तसेवा
अमरावती,
National Agricultural Exhibition : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबरपासून राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात सुरू झाले आहे. या प्रदर्शनीत अहमदनगर येथून आलेला सुलतान नावाचा रेडा सर्वांचे आकर्षण ठरत आहे. त्याची किंमत 51 लाख आहे.
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात उभी पिके, पशू प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, शेती अवजारे, खाद्य बाजारासह शेतकर्यांसाठी कार्यशाळा होत आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे होणार आहे. प्रदर्शनीमध्ये आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरलेला सुलतान रेडा सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे. सुलतान मुरराहा जातीचा रेडा आहे. National Agricultural Exhibition एका चारचाकी पेक्षापण महाग त्याची किंमत आहे. ती ऐकून सर्व थक्क झाले आहे. महाराषट्र शासन आयोजित महापशुधन एक्स्पो-2023 मध्ये सुलतानचा देशातून द्वितीय क्रमांक व महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक आला होता. सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याची खूप काळजी घेतली. सुलतानला रोज 5 किलो शेंगदाणा पेंड, 10 ली. दूध, अंडे, हिरवा चारा, उस, गवत, मकाई लागते.
मुरराहा मादी दिवसाला 27 लिटर दूध देते. सुलतानच वय 5 वर्ष 3 महिने आणि वजन 1,100 किलो आहे. यासोबतच पशु प्रदर्शनीत विविध जातीच्या म्हशी, गाई व वळू सुद्धा आले आहे. लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस, पांढरा शुभ्र रंग व धनुष्यबाणासारखे शिंग असलेली गाय व वळू, धिपाड शरीसयष्टीची शेती काम व दुधासाठी प्रसिद्ध असलेली लातूरची देवणी गाय प्रदर्शनीचे आकर्षण आहे. 30 ते 35 लिटर दूध देणार्या होलस्टेन फ्रिसन व जर्सी संकरित गायी पशु प्रदर्शनीच्या दूध उत्पादन स्पर्धेत सहभागी झाल्या आहे. National Agricultural Exhibition उत्तर भारतातील राठी, साहिवाल, पाकिस्तान सीमेवरची चोलीस्तानी गाईची जात आपल्याला येथे पाहायला मिळेल. लाल कंधारी, खिल्लार, देवणी, गवळव जातीचे व उच्च दर्जाची प्रजनन क्षमता असलेले वळू या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळेल.